नेशन न्यूज मराठी टीम.
खामगाव / प्रतिनिधी – जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या निषेधार्थ ठीक ठिकाणी या घटनेचा मराठा समाजाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधवांचे आरक्षणाकरिता न्यायिक मार्गाने सुरु होते.
आंदोलन चिरडून काढण्या करिता दडपशाही चा वापर करीत आंदोलकावर अमानुष पणे गैर कायदेशीर रित्या केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ खामगांव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजातर्फे जोरदार घोषणाबाजी करून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शहर व ग्रामीण परिसरातील समस्त मराठा समाज उपस्थित होता.