नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा / प्रतिनिधी – हरियाणा येथे आशा कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ आज वर्धामध्ये सुद्धा वर्धा जिल्हा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन पुकारले होते.
हरियाणा येथे काही आशा कार्यकर्त्या यांच्या मागण्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले होते त्यांच्या मागण्या मान्य न करता उलट त्यांच्यावर लाठी चार्ज करत अरेस्ट करण्यात आले. दरम्यान त्यांना रात्रीच्या वेळी सोडण्यात आले तेही सुनसान जागेवर सोडण्यात आले त्यामुळे अशा वर्कर ची फजिती झाली त्यामुळे त्यांनी रॅली सुद्धा काढली त्यानंतर पोलीस प्रशिक्षणांनी निर्णय घेतला की त्यांच्या घरी त्यांना सोडून देण्यात येईल परंतु हे सरकार नेहमीच आशा वर्कर वर अन्याय करत असल्याचं यावेळी आंदोलनातून सांगण्यात आले.