DESK MARATHI NEWS ONLINE.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेणे नेहमीच आनंददायी असते. आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या दोघांशी माझी वैयक्तिकरित्या ओळख होती. संयुक्त श्रीलंकेतील तमिळ समुदायासाठी समानता, सन्मान आणि न्यायाच्या जीवनासाठी अटळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. माझ्या भेटीदरम्यान सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प आणि उपक्रम त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक