ठाणे/प्रतिनिधी – अवकळी पावसाने यंदा शेतकाऱ्यांसह शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापऱ्यांना सुद्धा झोडपून काढले आहे. अवकळी पावसामुळे भाज्यांचे मोठ नुकसान झाले आहे. परिणामी भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सर्वच भाजी मंडई मध्ये भाज्याचे दर वाढरले आहे. ताजी आणि स्वस्त किमतीत भाजी खरेदी करण्यासाठी पनवेल भाजी मार्केट मध्ये लोकं दुरून येतात. मात्र, पनवेल मधील बाजारात सध्या भाज्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडल्याने भाज्यांचे नुकसान झाले आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसला. दरम्यान भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत.
काकडी आणि पालक, मेथी, मुळा, कोथिंबीर,वाटाणा, फरसबी व फ्लॉवर, इत्यादींच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी चिंतेत आहेत. दर वाढल्यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजी महाग झाली असल्याने खायचं काय? असा प्रश्न सामान्य जनतेला भेडसावत आहे. पुढील काही दिवस असेच दर चालू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे व्यापारी देखील चिंतेत आहेत.



