महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर थोडक्यात

७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी– संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे निरंकारी मिशनचा 76वा वार्षिक निरंकारी संत समागम, गेल्या 75 वर्षांप्रमाणे याही वर्षी 28, 29 आणि 30 ऑक्टोबर 2023 रोजी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या उपस्थितीत भव्य रूपाने संपन्न होणार आहे. या समागमाचा दैवी आनंद जगभरातून येणारे सर्व निरंकारी भक्त आणि श्रद्धाळू भाविक घेतील. समागम म्हणजे संतांचा पवित्र संगम, या दैवी सोहळ्याची जय्यत तयारी निरंकारी भक्तांकडून पूर्ण समर्पणाने, निस्वार्थी व निष्काम भावनेने केली जात आहे. जिकडे पाहावे तिकडे हजारो भक्त नि:स्वार्थपणे आपली सेवा करत आहेत. नाचत नाचत, सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते सूर्यास्तापर्यंत सद्गुरुंचे प्रत्यक्ष रूपात दर्शन घेत आहेत. हा अनोखा देखावा पाहता निरंकारी मिशनची शिकवण सौहार्द आणि एकात्मतेची सुंदर अनुभूती दाखवत असल्याचे दिसते. लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्व भक्तगण या सेवांमध्ये उत्साहाने आणि मनापासून योगदान देत आहेत.

एका ठिकाणी मैदाने सपाट करण्यासाठी मातीने भरलेली घमेली तर दुसऱ्या बाजूने रिकामी घमेली घेऊन जाताना भाविक दिसत आहेत. लहान मुलेही चिमुकल्या हातात घमेली धरून सेवेचा आनंद लुटत आहेत. सर्वत्र निस्वार्थ सेवेचा अनोखा नजारा पाहायला मिळत आहे . येणार्‍या सर्व श्रद्धाळू, भाविक सज्जनांचे भव्य स्वागत करण्यासाठी हे सर्व केले जात आहे जेणेकरून त्यांना समागमाचा अद्वैत, परमोच्च, दैवी सुखाचा लाभ प्राप्त करता येईल.

उल्लेखनीय आहे, की पूर्वतयारीसाठी मुंबईसह महाराष्ट्रातून मागील दोन महिन्यांपासून तुकड्या तुकड्यांनी निरंकारी सेवादल स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण नियमितपणे समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीच्या कार्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये मुंबईहून सुमारे 8 हजार तर उर्वरित महाराष्ट्रातून सुमारे 7 हजार स्वयंसेवकांचा समावेश आहे.

समागमासाठी येणाऱ्या संतांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तंबू उभारण्यासारखी अनेक सेवाकार्य सेवादारांकडून मोठ्या उत्साहाने सुरू आहेत. समागम स्थळावर मुख्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. भक्तगणांच्या अहोरात्र निस्वार्थी सेवेचे सकारात्मक फलित म्हणजे अल्पावधीतच तंबूंनी सजलेले सुंदर शहर एका आकर्षक समागम स्थळात रूपांतरित होणार आहे.

76व्या वार्षिक निरंकारी संत समागमात संपूर्ण भारत तथा देश विदेशातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. निरंकारी सेवादलाचे बंधू आणि भगिनी निळा आणि खाकी गणवेश परिधान करून, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळावर येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करताना आणि त्यांना त्यांच्या पूर्वनिश्चित निवासस्थानी नेण्याची व्यवस्था करताना दिसतील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »