Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
मनोरंजन लोकप्रिय बातम्या

प्रार्थना बेहरे आणि भूषण प्रधानची हटके लव्हस्टोरी अल्ट्रा झकास ओटीटीवर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/ प्रतिनिधी – आपल्या गोड हास्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान हे दोघे लवकरच मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच ‘अल्ट्रा झकास’ वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर रिलीज झाला आहे. 

ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडते. मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नसते. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात. त्याचप्रमाणे रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिक प्रेक्षकांना खोलवर भावत आहे. आयुष्याला निरर्थक मानून व्यसनाच्या आहारी गेलेल्या सिद्धार्थची नेमकी काय रहस्यमय गोष्ट आहे? ते रंगीत चित्रपटात पाहता येणार आहे. तर लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, याचे धम्माल पद्धतीने चित्रीकरण केले आहे. 

“आज ओटीटी माध्यम लहानांपासून मोठ्यांपर्यंत घराघरात पोहचत आहे. अल्ट्रा झकास सारख्या मोठ्या ओटीटीवर माझे सलग चार चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.” असे अभिनेता भूषण प्रधानने याने माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X