नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती /प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील 12 राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह 89 मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील अमरावतीत ३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आज आपल्या कुटुंबासह अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये जाऊन दिनेश बुब यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या निवडणुकीमध्ये प्रहारचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



