महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

“चाचा चौधरी और चुनवी दंगल” चित्रकथांच्या लोकप्रिय व्यक्तिरेखा करणार युवा मतदात्याला प्रोत्साहित

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – बालपणीच्या रम्य दिवसांकडे मागे वळून पाहताना, आपण चाचा चौधरीच्या चित्रकथांच्‍या सोबतीने मोठे झालो, त्यावेळी वाचलेल्या साहसांचे स्मरण करतो. चाचा चौधरी आणि साबू या पात्रांनी  सर्व पिढ्यांमधील वाचकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे. कारण या पात्रांनी  संवाद आणि कृतींनी प्रेक्षकांना मोहित केले आहे.
चाचा चौधरी चित्रकथांची प्रचंड लोकप्रियता पाहता, एक अनोखा उपक्रम म्हणून, “चाचा चौधरी और चुनवी दंगल” या चित्रकथा पुस्तकाचे आज नवी दिल्लीतील ‘निर्वाचन सदन’  येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

हा कॉमिक्सचा अंक भारतीय निवडणूक आयोग आणि प्राण कॉमिक्स यांचा संयुक्त उपक्रम आहे. तरुणांना लोकशाहीच्या उत्सवात मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. यात प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत प्राण कुमार शर्मा यांनी साकारलेल्या चाचा चौधरी, साबू, बिल्लू या लोकप्रिय व्यंग व्यक्तिरेखांचा समावेश आहे.

हे व्यंगचित्र पुस्तक एक बहुआयामी साधन म्हणून काम करत मतदार जागृतीच्या विविध गंभीर पैलूंवर भाष्य करेल. आगामी निवडणुकांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून, तरुण पात्र मतदारांना स्वतःची नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या उपक्रमाचे प्राथमिक लक्ष्‍य  आहे.

हे व्यंगचित्र पुस्तक छापील आणि डिजिटल दोन्ही स्वरूपांमध्ये उपलब्ध असून सर्व व्यासपीठांवर याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, भविष्यातील मतदारांना निवडणुकीबद्दल शिक्षित करून युवकांना प्रेरणा देण्यासाठी या कॉमिक अंकाच्या मोफत प्रती शाळांमध्ये वितरित केल्या जाणार आहेत.

कॉमिकची डिजिटल प्रत येथे मिळू शकते: https://ecisveep.nic.in/files/file/2152-chacha-chaudhary-aur-chunavi-dangal/ 

या कार्यक्रमाला प्राण कॉमिक्सचे संचालक आणि प्रकाशक निखिल प्राण तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »