महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

बाईक चोरून त्यांची स्वस्तात विक्री करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात,आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नेशन न्युज मराठी टीम.

डोंबिवली – मौज मजा करण्यासाठी चक्क दुचाकी चोरून भंगारात विकण्याचा मार्ग अवलंबणाऱ्या आणि आपल्या बरोबर इतरांनाही सहभागी करून घेणाऱ्या दीपक सलगरे याच्यासह पाच जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यावेळी चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या सामान्य ग्राहकांनी आधी कागदपत्रांची पडताळणी करावी आणि त्यानंतर दुचाकी खरेदी करावे अन्यथा चोरीच्या गाड्या खरेदी केल्याचा गुन्हा सामान्य ग्राहकांवर लावण्यात येईल अशी माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली

अंबरनाथच्या पालेगाव गावातून दिपक सलगरेला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, मध्यवर्ती आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बाईक चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या बाईक चोरण्यामागचे कारण ऐकून तर पोलीस चक्रावून गेले. दिपकचा प्रेम विवाह झाला असून पत्नीसोबत मौजमजा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याची आणि त्यातून या बाईक चोरल्याचे सांगितल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. चोरलेल्या या बाईक्स दिपकने पलावा येथे राहणाऱ्या राहुल भागवत डावरे याच्या मदतीने गाड्यांचे पेपर नंतर बनवून देतो असे सांगून त्यांची स्वस्तात विक्री केली जायची. तर काही गाड्या या भंगार व्यावसायिक चिनमून चौहानला आणि चौहानने त्या गाड्यांचे सुट्टे भाग करून हे भंगार धर्मदेव रामचंद्र चौहान, समशेर शाबीर खान आणि भैरवसिंग प्रेमसिंग खरवड याना विकल्याचेही मानपाडा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

या आरोपींकडून मानपाडा पोलिसांनी 17 बाईक्स, 23 बाईकचे इंजिन, 28 इतर सुट्टे भाग, 12 मॅकव्हील आणि एक कटर मशीन जप्त केल्याची माहितीही डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. या सर्व आरोपींवर मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, मध्यवर्ती, बाजारपेठ, कस्तुरबा पोलीस ठाणे हद्दीतील 16 गुन्हे उघडकीस आले असून येत्या काळात आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस नाईक प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोलीस शिपाई संतोष वायकर, ताराचंद सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, अशोक आहेर आदींच्या पथकाने केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »