महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
न्युजरूम पोलिस टाइम्स

दारुच्या नशेत चोरली रिक्षा, एसी मेकॅनिकलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

DESK MARATHI NEWS.

डोंबिवली/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेकडील जिम्मी बाग मधील जय श्री हरी चाळीसमोर 18 तारखेला फिर्यादि राजेश देवीदयाल मेहुलीया यांच्या राहत्या घरासमोर पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली होती. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी गुन्हाचा तपास करून एकाला अटक केली आहे.अटक आरोपी हा एसी मेकनीक असून दारूच्या नशेत त्याने रिक्षा चोरली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल मनोज बर्वे( २६, रूम नं १५, योगेश अर्पा, करपे वाडी, न्यु जिम्मी बाग, कल्याण पुर्व) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.या गुन्हयाच्या तपासात 21 तारखेला गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रांजलला अटक केली.पोलीसांनी त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेले ६५,००० रू. किमतीची MH-05-CG-8672 रिक्षा जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, कल्याण परीमंडळ -३ कल्याण अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वपोनिरीक्षक गणेश न्हायदे, सहा.पो.निरी. दर्शन पाटील, सहा.पो.निरी. संदीप भालेराव, पोहवा बुधवंत, पोहवा जाधव, पोहवा भामरे, पोहवा , पोहवा सौंदाणे, पोहवा , पोहवा कापडी, पोशि सोनवळे, पोशि सोनवणे यांचे पथकाने केलेली आहे.

रिक्षाचोरी प्रकरणी अटक केलेला प्रांजल मनोज बर्वे हा एका एसी मेकॅनिकला आहे. दारु प्यायच्या सवयीने त्याने दारु आणण्यासाठी रिक्षा चोरली. सीएनजी संपल्यावर रिक्षा एका ठिकाणी साेडून पसार झाला होता. अखेर सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी रिक्षा हस्तगत केली आहे.चोरीस गेलेली रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपोजवळ उभी होती. पोलिसांना प्रश्न पडला होता की, चोरी झालेली रिक्षा इकडे का पार्क करण्यात केली ? पोलिसांना त्याठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरेचा फुटेज तपासले. त्यानंतर पोलिस कर्मचारी रोहित बुधवंत यांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या रिक्षा चोरट्याला शोधून काढले. रिक्षा चोरणारा प्रांजल बर्वे होता. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस त्याने दारु प्यायली होती. त्याला अजून दारु पाहिजे होती. त्यासाठी त्याने त्याच्या इमारतीच्या बाहेर मैदाना उभी असलेली रिक्षा सुरु करून दारु आणण्यासाठी निघाला. रिक्षातील सीएनजी संपल्याने ती रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपो समोर बंद पडली. तो रिक्षा तिथेच सोडून घरी निघून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×