DESK MARATHI NEWS ONLINE.
जळगाव/प्रतिनिधी – भुसावळ येथे झालेल्या गोळीबारामुळे पूर्ण जळगाव जिल्ह्या हादरला आहे. भुसावळ (Bhusawal) शहरात रात्री दहाच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे बांधकाम व्यावसायिक देवा राखुंडे यांच्यावरती मरीमाता चौकामध्ये अज्ञातांनी गोळीबार केला. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. यादरम्यान आरोपींनी घटणस्थळावरून पळ काढला. भुसावळमधील जुना सातारा रोड येथील मरीमाता चौकामध्ये ही घटना घडली. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि देवा राखुंडे हे दोघे चार चाकी मधून शहरात येत असताना त्यांच्यावरती अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. त्या दोघांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केले असता त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले.
गोळीबारामुळे (Firing) भुसावळ शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांड (Murder) प्रकरणात राजू सुर्यवंशी याला ताब्यात घेतले, सुर्यवंशी यांच्यासह या हत्याकांडात इयान शेख गुलाम रसूल, विकास पांडुरंग लोहार, धरमसि रामसिंग पंडित हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.