DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – लोढा पलावा एक्सपेरिया येथील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्न्यातून सुरु असलेल्या उडाणपुलाच्या कामाचा आढावा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे यांनी गुरुवार 17 तारखेला एम.एस. आर.डी.सी अधिकाऱ्यांसोबत घेतला.
या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून तो लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. 31 मे 2025 रोजी हा पूल खुला होणार असल्याचे आश्वासन उपस्थित अधिकारी यांनी दिले आहे.यामुळे लवकरच ट्रॅफिक समस्याचे निवारण होऊन कल्याण डोंबिवली करांना जलद रस्ते वाहतुकीचा पर्याय खुला होणार असल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले. यावेळी कल्याण उपजिल्हाअध्यक्ष बंडू पाटील, अर्जुन पाटील, दत्ता वझे, रोहिदास म्हात्रे, सोनू संते, गजानन पाटील, अमोल भोगले, विलास भंडारी आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.