महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मनोरंजन महत्वाच्या बातम्या

अनेक अडचणींवर मात करीत ‘मोऱ्या’चित्रपट सुपरहिट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने ‘मोऱ्या’ हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे.

ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात ‘मोऱ्या’ खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे.

मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या ‘मोऱ्या’ला मिळत असलेला “द्विगुणित करणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवीत असून सर्व टीमने तीन वर्षे घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. येत्या आठवड्यात ‘मोऱ्या’ महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू, मराठी रसिकांचे प्रेम आम्हाला असेच मिळणार आहे” असे ‘मोऱ्या’च्या सर्व निर्मात्यांनी म्हटले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »