महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२३-२४, एन. के. टी. सभागृहात पार पडल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन संपन्न झाला.

विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आरोग्य असो की शैक्षणिक कौशल्य विकसित करण्यासाठी पालकांनी देखील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी भारतीय संस्कृती प्रमाणे आहार घेण्यात यावा. मोबाईलचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी करण्यात यावे. शारिरीक सुदृढतेसाठी व्यायाम, मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कलेला सादर करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले.

तालुका स्तरावरील विजेता विद्यार्थ्यांनी आज जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यासाठी उत्साही वातावरणात सहभाग नोंदविला. समूहगान (लहान), समूहगान (मोठा), वक्तृत्व (लहान), वक्तृत्व (मोठा), नाटक सादरीकरण प्रत्येक तालुक्यातील पाच लोककला व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले आहे.

यावेळी उप शिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, गटशिक्षणाधिकारी भिवंडी संजय अस्वले, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, एन. के. टी. हायस्कूलचे मुख्याध्यापक लिडीया सैलियन, परीक्षक प्रतिक्षा बोर्डे, परीक्षक माधुरी बागडे, परीक्षक स्वाती कदम, परीक्षक मेधा दिवेकर तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ. गंगाराम ढमके व मनोहर मडके यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे मोलाचे काम केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »