महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी राजकीय

विकासाच्या कामावर बोलण्यासाठी सतेज पाटलांचे,संजय मंडलिक यांना खुले आव्हान

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कोल्हापूर/प्रतिनिधी – शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा आता राजकारणात उतरला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपैकी एक असेलल्या कोल्हापूरच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. कोल्हापूमध्ये शाहू महाराज आणि खासदार संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मंडलिक यांनी आपल्या प्रचारसभेत थेट शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती. मंडलिक यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “संजय मंडलिक शाहू महाराजांवर बोलायला लागले, प्राध्यापकांनी असे वागू नये असे म्हणतात, मात्र ते वागत आहेत. शेवटी मला सुद्धा माझी हलगी वाजवावी लागेल अजून चौदा दिवस आहेत. बंटी पाटील गप्प बसणार नाही. तुम्ही बंटी पाटलांवर टीका करा हा पाटील तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. मात्र, शाहू महाराज आमची अस्मिता आहे. त्यांना चॅलेंज केलं आहे. विकासाच्या कामावर गप्पा मारायला समोर यावं. कशाला त्यांना तुम्ही विनंती करता मी यायला तयार आहे. पाच वर्षात तुम्ही काय केल आणि पाच वर्षात कोल्हापूरचं काय नुकसान झालं? हे सांगायला मी तयार आहे.” अशी जहरी टीका सतेज पाटील यांनी आपल्या विरोधकावर केली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अप्पी पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार सतेज पाटील बोलत होते.

Related Posts
Translate »