नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई / प्रतिनिधी – जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा जाहीर निषेध नवी मुंबई मध्ये मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने करण्यात आला.
यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सरकार चा जाहीर निषेध केला मराठा समाजाचा गळचेपी पणा केला असल्याचे सांगण्यात आले तसेच पोलीस अधिकारी तुषार जोशी यांच्या वर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच शरद पवार विजय वडेट्टीवार अंबादास दानवे,यांना मराठा हा शब्द उच्चरण्याचा काहीही अधिकार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Related Posts