नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकाला गेल्या 17 वर्षांपासून कसलेही फिक्स मानधन मिळत नाही, तसेच त्याला पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून देखील अद्याप दर्जा मिळालेला नाही. अनेक सुविधा पासून शासकीय मानधनापासून ग्राम रोजगार सेवका वंचित आहे.
यामुळे ग्राम रोजगार सेवकांच्या वतीने संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ग्राम रोजगार सेवकांना अठरा हजार रुपये किमान वेतन मानधन द्यावे, पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा या दोन मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.



