DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला कल्याण गुन्हे अनव्हेशन विभागाने बेड्या ठोकून गजाजाड केले.पोलिसांकडून मिळालवलेल्या माहितीनुसार, बिंदास अनंत म्हात्रे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुस आणि एका काडतुसाची पुंगळी असा ६२ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई मिथुन राठोड यांना कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली चक्कीनाका परिसरात राहणारा एक इसम विनापरवाना गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बिंदासला कल्याण कोळसेवाडी परिसरातून अटक केली.
पोलिसांनी बिंदासच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या कडून एक देशी पिस्तुल, मॅगझिन, दोन जिवंत काडतूस आणि एक काडतुसाची पुंगळी असा ६२ हजारांचा शस्त्रसाठा केला जप्त केला आहे. बिंदासवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिंदासने पिस्तूल कुठून आणले व कशासाठी आणले आहे याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोउपनिरीक्षक किरण भिसे, सपोउपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा विजय जिरे, पोहवा विलास कडु, पोना दिपक महाजन, पोशि विजेंद्र नवसारे, मपोहवा जोत्स्ना कुंभारे यांनी बजावली आहे