महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता चर्चेची बातमी

सात कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी जीएसटी विभागाकडून एकास अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट देयक देणाऱ्या करदात्या विरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी जगदीश जगन्नाथ पाटील, (वय ४८) या व्यापाऱ्यास अटक केली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी दिली.

मे. अर्णव क्रिएशन या व्यापाऱ्याचे दोन मोठे पुरवठादार मे. हेना इंटरप्रायझेस व मे. एक्सकर्सी ओव्हरसिज हे करदाते अस्तित्वात नसून बोगस आहेत व त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी केली आहे. या करदात्यांकडून व्यापाऱ्याने रु.७.०८ कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, असे अन्वेषण भेटीदरम्यान आढळून आले.

या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी जगदीश जगन्नाथ पाटील यांस दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात सहायक राज्यकर आयुक्त अर्जुन प्रकाश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात, सहायक राज्यकर आयुक्त, रमेश अवघडे, राज्यकर निरिक्षक व कर सहायक प्रज्ञा ब्रम्हांडे यांनी ही कारवाई केली.

राज्यकर सह-आयुक्त अनिल भंडारी  व राज्यकर उपायुक्त मोहन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.

सन २०२२-२३ मध्ये खोटी देयके देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करुन करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी या मोहिमेअंतर्गत आतापर्यंतची ही ४९ वी अटक आहे, असे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे कळविले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »