छ. संभाजीनगर/प्रतिनिधी – आज जागतिक स्तरावर गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. हिंदू धर्मातील लोकांसाठी वैशाख पौर्णिमा जशी महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा (Buddha purnima) महत्त्वाची आहे. कारण गौतम बुद्धांचा जन्म या तारखेला झाला होता. तसेच याच दिवशी भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त छ. संभाजीनगर शहरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संगीत रजनी अन्नदान व श्रमनेर शिबिर होणार आहे.
आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध महासभा व भिकू संघच्या वतीने छ. संभाजीनगर मधील क्रांती चौकात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये श्रमनूर शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही रॅली क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार गाळण्यात आला. या रॅलीमध्ये बौद्ध महासभेच्या सेवकांनी सुद्धा सहभाग घेतला होता.