नवी दिल्ली/प्रतिनिधी -भारतीय हवाई दलाच्या टेस्ट पायलट स्कूलच्या प्रतिष्ठेच्या 47 व्या उड्डाण चाचणी अभ्यासक्रमाचा 23 मे 2025 रोजी बेंगळुरू येथील एअरक्राफ्ट अँड सिस्टिम्स टेस्टिंग इस्टॅब्लिशमेंट (एएसटीइ) येथे पार पडलेल्या समारंभपूर्वक “सुरंजन दास रात्रीभोज” सोहळ्याने समारोप झाला.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग, हवाई दलप्रमुख होते. त्यांनी सर्व पदवीधर अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली, तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल काही अधिकाऱ्यांना गौरवचिन्हे व ट्रॉफीज देऊन सन्मानित केले गेले. फ्लाइट टेस्ट कोर्स हा 48 आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम असून, अत्याधुनिक विमान व प्रणालींसाठी उड्डाण चाचण्या करण्याची देशाची क्षमता उभारण्यात या अभ्यासक्रमाचा महत्वाचा वाटा आहे.
आपल्या भाषणात एअर चीफ मार्शल सिंग यांनी उड्डाण चाचणी क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य, प्रामाणिकपणा व सेवाभावाची गरज अधोरेखित केली. स्वयंपूर्ण भारताच्या दिशेने भारतीय हवाई दलाच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी एएमसीए (अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट) आणि एलसीए एमके-II सारख्या स्वदेशी प्रकल्पांचा उल्लेख केला.
ते पुढे म्हणाले की, “अचूकता” आणि “उत्कृष्टता” या मूल्यांना अधिकाऱ्यांनी नेहमी जपावे, कारण हीच मूल्ये सशक्त, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आवश्यक आहेत.
समारंभात खालील अधिकाऱ्यांना विशेष पुरस्कारांनी गौरवले गेले:
“सुरंजन दास चषक” (सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थी टेस्ट पायलट): स्क्वाड्रन लीडर एस. भारद्वाज
“एअर चीफ ऑफ द एअर स्टाफ चषक” (उड्डाण मूल्यमापनातील सर्वोत्तम विद्यार्थी टेस्ट पायलट): स्क्वाड्रन लीडर अजय त्रिपाठी
“महाराजा हनुमंत सिंग तलवार” (सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थी फ्लाइट टेस्ट इंजिनिअर): स्क्वाड्रन लीडर शुभ्रज्योती पॉल
“डनलॉप चषक” (उड्डाण मूल्यमापनातील सर्वोत्तम विद्यार्थी टेस्ट इंजिनिअर): विंग कमांडर अश्विनी सिंग
“कपिल भार्गव चषक” (ग्राउंड विषयांतील सर्वोत्तम विद्यार्थी): मेजर कौस्तुभ कुंटे