नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कॅन्सरचे निदान करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे अत्याधुनिक असे पेट सिटी स्कॅनची (PET CT scan) सुविधा आता कल्याणातही उपलब्ध झाली आहे. कल्याणातील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. संदेश रोठे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील या पहिल्याच केंद्राचा आजपासून शुभारंभ करण्यात आला.
शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरचे निदान करण्यासाठी पेट सिटी स्कॅन (PET CT scan) महत्वाची भूमिका बजावतो. तर कॅन्सर असणाऱ्या 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांना त्यांच्या उपचारदरम्यान पेट सिटी स्कॅनची (PET CT scan) आवश्यकता भासते. त्यासाठी पॉझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (PET) आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी (CT) हे प्रगत आण्विक इमेजिंग तंत्र या अत्याधुनिक मशीनमध्ये एकत्र करण्यात आल्याची माहिती स्टार पेट सिटी स्कॅन केंद्राचे प्रमुख डॉ. संदेश रोठे यांनी दिली. तसेच पेट सिटी स्कॅनच्या केवळ एकाच इमेजिंग सत्रामध्ये शरीरातील पेशी रचना आणि त्यांचे कार्य या दोन्हीविषयी माहिती प्राप्त होते. या अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णाची कमीत कमी वेळेत अचूक आणि स्पष्ट तपासणी करणे शक्य असल्याचेही डॉ. रोठे यांनी सांगितले.
तर कॅन्सरवरील उपचारांचा खर्च आणि रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी आर्थिक ओढाताण विचारात घेता ही अत्याधुनिक सुविधा कमीत कमी दरांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. संदेश रोठे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कारणासाठी वापरतात पेट सिटी स्कॅन मशीन
बायोप्सी करण्यासाठी योग्य जागा शोधणे,
सुरू असणारे कॅन्सर उपचार योग्य प्रकारे कार्य करत आहेत की नाही तपासण्यासाठी
,रुग्णाला दिलेल्या उपचारांमुळे किती फरक पडला आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी,
पेट सिटी स्कॅन मशीनची अशी होणार मदत…
कॅन्सरचे निदान
कॅन्सर किती मोठा आहे आणि तो पसरला आहे की नाही हे शोधण्यासाठी (कॅन्सरची श्रेणी किंवा टप्पा ठरवण्यासाठी)
शस्त्रक्रिया करता येईल की नाही याचा निर्णय घेण्यासाठी
कॅन्सरवरील उत्तम उपचार कोणते हे ठरवण्यासाठी
कॅन्सर परत उद्भवणार की नाही हे तपासण्यासाठी
तापाचे कारण शोधण्यासाठी
स्मृतीभ्रंश निदान करण्यासाठी
अपॉइंटमेंटसाठी संपर्क : 99679006429
स्टार सिटी पेट सिटी स्कॅन अँड कॅन्सर केअर सर्व्हिसेस,
तळ मजला, एरिशिया अल्टीस कमर्शियल सेंटर, नवरंग बँकवेट हॉलच्या पुढे, बैल बाजार, कल्याण शिळ रोड,
कल्याण – पश्चिम