महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात आज सकाळी 9.15 वाजता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध झाले. गडकरी यांनी घंटा वाजवून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव आणि प्राधिकरणाच्या अध्यक्ष  अलका उपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि प्राधिकरणाच्या विश्वासार्हतेवर विश्वास दाखवल्याबद्दल गडकरी यांनी त्यांचे आभार मानले.

मुंबई शेअर बाजारात InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध होणे ही ऐतिहासिक घटना आहे, कारण यामुळे पायाभूत सुविधा संबंधी निधी पुरवठ्यामध्ये लोकसहभागाचा प्रवेश अधोरेखित होतो, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 25% एनसीडी राखीव ठेवल्या आहेत असे सांगत, InvIT च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या 7 तासांत जवळपास सातपट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. ही गुंतवणूक सर्वाधिक विश्वासार्ह असून वार्षिक 8.05 % इतके उत्पन्न देते, असे ते म्हणाले. या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना (सेवानिवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, छोटे आणि मध्यम व्यावसायिक) राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो, याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 10,000 रुपये इतक्या किमान गुंतवणुकीपासून सुरूवात करणे शक्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अंतर्गत लाभ दर खूप चांगला आहे, असे गडकरी म्हणाले. 26 नव्या द्रुतगती मार्गांसह अन्य काही प्रकल्प नियोजित आहेत ज्यांमुळे गुंतवणुकीच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील गुंतवणूक कायम ठेवण्याचे आवाहन गडकरी यांनी गुंतवणुकदारांना केले. पायाभूत सुविधा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम असतात आणि त्यातून चांगला परतावा मिळतो,  असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या दृष्टीतील ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी रोखे ही उत्तम संधी असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पायाभूत सुविधा विशेषतः रस्ते बांधण्यासाठी मोठी गुंतवणूक महत्त्वाची ठरते. रस्त्यांमुळे देशाचा सामाजिक-आर्थिक विकास शक्य होतो, असे सांगून गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला की येत्या काळात किरकोळ गुंतवणुकदार या प्रकल्पांमध्ये मोठ्या संख्येने गुंतवणूक करतील आणि पुढे, हळूहळू संस्थात्मक गुंतवणुकदारांना मागे टाकतील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »