महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

नवी मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन रॅकेटचा भांडाफोड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – गुन्हेगारीच्या घटनांमध्ये परदेशी नागरिकांचे वाढत चाललेले प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे. नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय किंवा वैद्यकीय व्हिसावर भारतात येतात. त्यानंतर ते येथेच स्थायिक होऊन गैरधंदे करायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी होतात. नवी मुंबईत अशाच एका नायजेरियन रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे.

नवी मुंबई पोलिसांनी शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करत नायजेरियन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 24 कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईतील आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

नवी मुंबईतील वाशीच्या कोपरीगाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. या महितीच्या आधारावर पोलिसांनी २६ एप्रिल रोजी कोपरीगाव येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी आरोपी नायजेरियन आरोपींना बेड्या ठोकल्या. ताब्यातील प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करत पोलिसांनी 30 ते 50 वयोगटातील 11 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या ड्रग्समध्ये कोकेन, एमडीएमए व मॉफेड्रिन यासोबत मोबाईल आणि इतर वस्तूही जप्त केल्या असून या सर्वांची एकूण किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे. पोलिस अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांची चौकशी करत आहेत.

Related Posts
Translate »