DESK MARATHI NEWS NETWORK.
भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.या उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बहिष्कार घातला असून जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव लागत नाही, तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्र उद्घाटन सोहळे व आनंदोत्सव साजरे करणार नाही अशी भूमिका स्थानिक भूमीपुत्रांनी घेतली असून आजच्या उदघाटन सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
केंद्र व राज्य सरकार ज्यावेळेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दि.बा पाटील यांचे नाव लावेल, त्यावेळेस आम्ही सर्व स्थानिक भूमिपुत्र लाखोंच्या संख्येने जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानू व सन्मान करू असेही खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.