महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image यशोगाथा लोकप्रिय बातम्या

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर ‘लोकसत्ता तरूण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानीत

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मुंबई – तरूण वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणा-या युवकांचा शोध घेऊन त्यांना लोकसत्ता समुहाच्या वतीने ‘तरूण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात येत असते. यावर्षीच्या ‘प्रशासकीय सेवा’ क्षेत्रातील ‘लोकसत्ता तरूण तेजांकित’ पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना मुंबई येथे विशेष समारंभात केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शुभहस्ते, एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

लोकोपयोगी कामांमध्ये झोकून देत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या युवकांमधील ऊर्जा, उद्यमशीलता, जिद्द आणि प्रज्ञेला गौरविणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठीची निवड ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर, ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रियदर्शनी कर्वे, ,एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या समितीने केली आहे.

भविष्यानेही आशेने पहावे अशा वर्तमानातील प्रज्ञावंत युवकांचा शोध घेऊन त्यांना ‘लोकसत्ता तरूण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्याची व यामधून त्यांच्यामधील नवनवोन्मेषशाली ऊर्जेला नवी प्रेरणा देण्याचे व काहीतरी सकारात्मक करू पाहणा-या नव्या पिढीसमोर नवा आदर्श उभा करण्याचे काम लोकसत्ता समुहाच्या वतीने करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने करोना काळात जवळपास दोन वर्षे जीवनमान थिजवून टाकलेले असतानाही आपल्या कार्यमग्नतेतून लक्ष्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलेल्या तरूणाईच्या कार्याने निवड समिती विशेष प्रभावित झाल्याचे मत समितीने नोंदविले आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या लोकाभिमुख व लक्षवेधी कार्याची दखल घेत त्यांची ‘लोकसत्ता तरूण तेजांकित’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »