महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने १९.८४ कोटीचा बनावट जीएसटी घोटाळा केला उघड

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी मुंबई – नवी मुंबईच्या सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर  आयुक्तालयाने  काल 30 मार्च 2022 रोजी 19 कोटी 84 लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघड केला. या प्रकरणी मे. फॉर्च्युन ग्लोबल ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. सिंथेटिक रबरचा व्यापार करणाऱ्या या विक्रोळी स्थित खासगी कंपनीने 110 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविले आणि त्याचा वापर केला.

मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या प्रधान मुख्य  आयुक्त कार्यालयाच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयातील कर चुकवेगिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपरोक्त कंपनीविरुद्ध चौकशी सुरु केली. त्यातून असे दिसून आले की या कंपनीने अस्तित्वात नसलेल्या 8 कंपन्यांच्या नावाच्या खोट्या पावत्यांचा वापर करून प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवा न पुरवता फसवणुकीने 9 कोटी 92 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले आहे किंवा इतरांना दिले आहे.

सीजीएसटी कायदा 2017 मधील  कलम 69 अंतर्गत, कलम 132(1) (ब)आणि (क) अंतर्गत या प्रकरणातील आरोपीला अटक करून आज 31 मार्च 2022 रोजी वाशीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि  त्याला 13 एप्रिल 2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने कर-चुकवेगिरीविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे.  प्रामाणिक तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या करदात्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्धेला तोंड द्यायला लावून आणि बनावट पावत्या जारी करून सरकारचा देय महसूल बुडवून कर-चुकवेगिरी करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोहिमेत कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा भाग म्हणून केलेल्या कारवाईत, सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने  आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये 500 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 20 कोटी रुपये वसूल केले तसेच या संदर्भात 14 व्यक्तींना अटकदेखील केली.

अशाच प्रकारच्या आणखी एका प्रकरणात, ठाणे ग्रामीण सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ठाणेस्थित मे.मोटेक ट्रेडर्स या कंपनीने केलेल्या 176 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या एका जीएसटी व्यावसायिकाला अटक केली. या आरोपीला 30 मार्च 2022 रोजी अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी करण्यात आलेली ही तिसरी अटक आहे.

सीजीएसटी विभागाचे अधिकारी कर चुकवेगिरी करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी डेटा विश्लेषणासारख्या साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण यांचा वापर करून मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सात महिन्यांत 1170 हून अधिक गुन्हे दाखल केले, 7400 कोटी रुपयांच्या कर चुकवेगिरीची प्रकरणे शोधली, 875 कोटी रुपये वसूल केले तसेच  67 व्यक्तींना अटक देखील केली. सीजीएसटी विभाग येत्या आर्थिक वर्षातदेखील प्रामाणिक करदात्यांना चुकीच्या स्पर्धेला तोंड द्यायला लावणाऱ्या आणि सरकारचा अधिकार असलेला महसूल बुडवून कर चुकवेगिरी करणाऱ्या तसेच आयटीसीबाबत फसवणूक करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »