महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान – ॲड. प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

सांगली/प्रतिनिधी – नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही तर, ठोकशाहीचा पंतप्रधान आहे. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तो एकही पत्रकार परिषद घेणार नाही, त्याला माहीत आहे सभेत आपण फेकू शकतो. पत्रकारांना समोर जाऊन उत्तर द्यायला मोदी घाबरतो. मोदी पत्रकाराला घाबरतो कारण पत्रकार याच्यापेक्षा हुशार आहेत, असा हा भित्रा पंतप्रधान आहे. याची नावालाच फक्त 56 इंच छाती आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली येथे आज सत्ता संपादन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेत त्यांनी आरएसएस आणि भाजप यांच्यावर प्रखर टीका केली आहे.
आरएसएस भाजपच्या दहा वर्षातील सत्तेचा हिशोब मांडायची सुरुवात केली पाहिजे. या देशात टोमॅटोचा तुटवडा करून, ३५ हजार कोटींची लूट केली आहे. यावर भाजप – आरएसएसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. हे लुटारुंचं सरकार आहे, यांना आता मार्गी लावून टाका. पुन्हा यांना सत्तेवर आणण्याची गरज नाही. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पाच वर्षात निवडणुका होतात सरकार बदलतं. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत यायचा कधी प्रयत्न केला नाही पण यावेळी आम्ही सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. असा जाहीर निर्धार ॲड. आंबेडकरांनी या सभेत केला.

मागच्या दहा वर्षात हजारोंच्यावरती आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धात सुद्धा एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७,६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख आहे, अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर असे म्हणत त्यांनी देशातून परदेशात जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गंभीर बाबीवर त्यांनी लक्ष वेधले आहे.

या मूर्ख सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाहीये, आमच्या बापजाद्याची इभ्रत वाचवायची आहे, म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ या भाजपने आणलीय. असे त्यांनी सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »