कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली २७ गावातील आडीवली ढोकळीचे अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी २७ गावातील रजिस्ट्रेशन बंद असल्याने २७ गावातील बांधकाम व्यावसायिक यांना सोबत घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना पत्र दिले होते. आणि या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केलीं होती पण काही त्यांच्या विरोधकांनी सोशल मीडियावर वेगवेगळे खोटे बदनामीकारक मेसेज व्हायरल केले असल्याचे कुणाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सागितले.
तसेंच काही दीवसापूर्वी २७ गावातील रजिस्ट्रेशन टोकन पद्धतीने चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आपल्याकडे केल्या होत्या टोकन पद्धतीने दीड ते दोन लाख रुपये रक्कम आकारली जात होती .ह्या प्रश्नाला आपण वाचा फोडल्यामुळे माझी व नाना पटोले यांची सोशल मीडिया वर मेसेज व्हायरल करून काही विरोधक बदनामी करत असल्याचे त्यांनी या वेळी सागितले आहे.
त्यामुळे मानपाडा पोलीस, ठाणे पोलिस आयुक्त यांना पत्र देऊन संबंधितावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली आहे.जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आपण ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सागितले आहे.