महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महापालिकांनी मदत करावी जिल्हाधिकारी यांचे निर्देश

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे- कोरोनामुळे अनाथ झालेल्या सज्ञान मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी महापालिकांनी त्यांच्या निधीतून अशा मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत करावी, त्यांना मालमत्ते विषयक हक्क मिळवून द्यावा, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा महिलांना लाभ मिळवून द्यावा व रस्त्यावरील बालकांना महानगरपालिकेतर्फे निवारागृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.

कोरोनाकाळात बालकांची काळजी व संरक्षणासाठी असलेल्या जिल्हा कृती दलाची बैठक नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. यावेळी कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

कोरोना कालावधीमध्ये अनाथ झालेल्या परंतू अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेले मुल-मुली शिक्षण घेत असतील त्यांना आर्थिक परिस्थिती अभावी शैक्षणिक शुल्क भरता येत नसेल अशा वेळी महानगरपालिकांनी त्यांच्या निधीमधुन ठराविक रक्कम निश्चित करून त्या मुला-मुलींचे शिक्षण थांबणार नाही यासाठी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांचे वारसाच्या नोंदी करुन त्यांच्या मयत पालकांच्या नावे असलेल्या मिळकतीवर नोंदी करुन घेण्याबाबत महानगरपालिका व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिल्या. कोरोना कालावधी मध्ये एकूण ४२९ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्याबाबत त्याबाबत तहसीलदारांना निर्देश देण्यात आले.

सर्वेक्षण झालेल्या रस्त्यावरील मुलं, बालकांसाठी महानगरपालिकेने रात्र निवारागृह किंवा दिवस निवारागृह चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जागेसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा या जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत करून द्याव्यात, असेही श्री. नार्वेकर यांनी सांगितले. कृती दलाचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »