महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क न्युजरूम राजकीय

तब्बेत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मतदानावेळी उपस्थित नव्हतो – खासदार बाळ्या मामा

DESK MARATHI NEWS ONLINE.

भिवंडी/प्रतिनिधी – तब्येत बरी नसल्याने वक्फ बोर्ड निर्णयाच्या मतदानावेळी मी उपस्थित राहू शकलो नाही मात्र विरोधक माझी बदनामी करून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्पष्टीकरण भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे.

संसदेत वक्फ बोर्ड निर्णयासंदर्भात झालेल्या मातदानावेळी वक्फ बोर्ड समितीचे सदस्य व भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांच्या गैरहजेरीबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.त्यावर खासदार बाळ्या मामा यांनी आज स्पष्टीकरण दिले.तब्बेत बारी नसल्याने आपण मातदानावेळी संसदेत हजर राहू शकलो नव्हतो.याच दरम्यान आपण प्रमुख विश्वास्थ असलेल्या कार्ला येथील श्री एकविरा देवी यात्रेच्या बैठकीला देखील हजर नव्हतो,त्यावेळी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये काही समाजकंटकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली होती.याविरोधात आपण भिवंडी पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.याच दिवशी वक्फ बोर्ड बिलाच्या मातदानादिवशी गैरहजर राहिल्याने विरोधकांनी मुस्लिम बांधवांमध्ये माझी बदनामी करण्याच्या हेतूने मेसेज पसरवले,मी वक्फ बोर्ड समितीचा सदस्य असल्याने प्रत्येक वेळी समितीच्या सभेत उपस्थित राहून या बिलाबाबत आमच्या पक्षाची व माझी भूमिका मांडली आहे.

केवळ तब्बेत बरी नसल्याने मला या मतदानाला उपस्थित राहता आले नाही.मात्र विरोधकांनी याच बाबीचा फायदा घेऊन माझी बदनामी करून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आपण आपल्या कामांच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देऊ व वक्फ बोर्डाच्या निर्णयासंदर्भात पक्ष व पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतली त्याबाजूने ठाम उभा राहू असेही खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »