नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – जालन्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर झालेल्या अन्यायावर संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. लाठीचार्ठिज चे आदेश देणाऱ्या सरकार विरोधी घोषणा देत विविध आंदोलनाद्वारे घटनेचा निषेध नोंदविला जात आहे.
अमरावतीमध्ये देखील वंचितच्या वतीने निषेध करण्यात आला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. अमरावतीच्या पंचवटी चौकात महायुती सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जोरदार घोषणाबाजी देखील कऱण्यात आली आहे.
Related Posts



