नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी – जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज या संदर्भात चांदवड तालुक्यातील सकल मराठा समाज यांनी गणुर चौफुली येथे चांदवड मनमाड राज्य महामार्ग या ठिकाणी अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले व शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी हा मोर्चा चांदवड शासकीय विश्रामगृह येथून कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर बसले होते. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोर्चेकरी हे आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही बसलो आहोत असे घोषणाबाजी देत शासनाचा विरोध केला.