Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
बिंदास बोल महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अमरावती/प्रतिनिधी – उष्णतेच्या लाटेमुळे देशातील जनता हैराण झाली आहे. उष्माघाताने (Heatstroke) आतापर्यंत 41 लोकांचा बळी घेतला. या मृतांमध्ये 25 निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सूर्य ओकत असलेल्या आगीमुळे जिवाची काहिली होत आहे. मात्र उन्हाळ्याला कंटाळलेल्या लोकांची प्रतिक्षा थोड्याच दिवास संपणार आहे. कारण बहुप्रतिक्षित मान्सूनचे भारतात आगमन झाले असून 10 ते 15 जूनदरम्यान विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे. तर 3 ते 4 जूनपर्यंत मान्सून पूर्व पावसाचे आगमन अमरावतीसह विदर्भात (Vidarbha) होणार आहे. मान्सून केरळ कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागात पोहचला आहे. सध्या अरबी समुद्रात जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत.

यावेळी मान्सूनचा पाऊस (Rain) विदर्भात बंगालच्या उपसागरातून (आंध्र तेलंगणामार्गे) येण्याची शक्यता आहे. आज पासून पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 6 जूनपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात 3 व 4 जूनला हलक्या पावसाची शक्यता शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा.अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

Translate »
X