DESK MARATHI NEWS.
कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांवर रागाचा पारा वाढला आहे पोलिसांनी शहानिशा आणि चौकशी करून गुन्हे दाखल करावेत त्यात संबंधितांची नाहक बदनामी होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कल्याण पश्चिमेतील ठाणकर भागात राहणारी ४१ वर्षीय महिलेला छळवणूक आणि विनयभंग केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगले याच्यावर विविध कलमान्वये महिलेचा छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहन उगले वारंवार पीडित महिलेला वाईट नजरेने पाहून तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे
पीडित महिलेने कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .दरम्यान या प्रकरणावर बोलताना आ.विश्वनाथ भोईर यांनी संताप व्यक्त करीत पोलिसांनी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करताना शहानिशा आणि चौकशी करावी मग गुन्हा दाखल करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे उपशहर अध्यक्ष व माजी नगरसेवक मोहन उगले यावेळी बोलताना म्हणाले की ठाणकरपाडा प्रभागात काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जिंकण्याची शक्यता कमी असल्याने कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मला गोवण्यात येत आहे येथे शिवसेनेच प्राबल्य असल्याने कोणाचेही डाळ शिजणार नाही त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होण्याची शृंखला अधिकच वाढणार आहे पोलिस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की शहानिशा करून गुन्हे दाखल करावे.
पण या सर्व प्रकरणाकडे पाहता जर हा गुन्हा खरा आहे तर एक लोकप्रतिनिधीवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे गंभीर बाब आहेच पण तेवढीच लज्जास्पद बाब आहे. आणि जर हा गुन्हा खोटा आहे तर मग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे का? असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे. पोलिस तपासात सत्य हे बाहेर येईलच आणि खरा गुन्हेगार आणि त्यामागील सत्य बाहेर येईल अशी अशा आहे.