नेशन न्यूज मराठी टीम.
गोदिया/प्रतिनिधी – एलआयसी, एसबीआय मधील जनतेच्या पैसाची आदानीने लुट केली आहे. अदानीने देशातील जनतेचा पैसा बळकवला आहे. हे सर्व चित्र जनतेच्या समोर आलेले आहे. त्यामुळे काँगेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. प्रधानमंत्री जेपीसी लावण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचण काय आहे? असा सवाल नाना पटोले यांनी सरकारला केला. जनतेच्या पैशाची लुट होत असताना कांग्रेस शांत बसणार नाही आशी यावेळी ते म्हणाले.
तर मोदी व अदानी यांचे संबंध जनतेला माहिती आहेत. त्यामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आण अदानी यांचे संबंध काय? तर दुसरीकडे शरद पवार यांनी अदानींची पाठराखण केली आहे असा प्रश्न माध्यमांनी विचरला असता . हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असावा, पवार साहेब स्वतः केंद्रात राहिलेले आहेत. त्यांना चांगलं माहिती असावं.अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.त्यच बरोबर ते हेही म्हणाले कि आदनीच्या विषयवर पंतप्रधान आजूनही काही बोलायला तयार नाही म्हणजे डाळ मे कूच काला है.पूर्ण डाळच काळी आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.



