DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइल चोराने मोबाइल चोरण्यासाठी एका तरुणाचे आयुष्य उध्वस्त केले आहे. सदर रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ठाण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या तरुणाला मोबाइल चोरांमुळे आयुष्य भराचा फटका बसला आहे. तपोवन एक्स्प्रेसने निघालेले तरूण शेतकरी गौरव रामदास निकम शहाड आणि आंबिवली दरम्यान एक्स्प्रेसच्या दारात फोनवरुन बोलत असताना एक्स्प्रेस धीम्या गतीने चालली होती. याचाच फायदा घेत अल्पवयीन मोबाइल चोराने हाताला फटका मारत मोबाईल खेचला.याच दरम्यान गौरव गाडीतून पडल्याने त्यांचा एक पाय गाडीच्या चाकाखाली आल्याने त्यांना एक पाय गमवावा लागला आहे. त्याच बरोबर त्यांच्या दुसऱ्या पायलाही गंभीर दुखापत झाली आहे. या अमानुष घटनेत चोरट्याने जखमी अवस्थेत असलेल्या प्रवाशाजवळील रोख रक्कमेसह सर्व ऐवज लुटले.हा तर माणुसकीला काळ फासण्याचा प्रकार असल्याचे दिसून आले आहे.
या घटनेचे गंभीर्य पाहता रेल्वे प्रवाशी सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र दिसत आहे. लोहमार्ग पोलिसांनी जखमी तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच काही तासातच या घटनेतील अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल अल्पवयीन चोरट्यांला ताब्यात घेतले असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांदे यांनी माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन चोरट्यावर यापूर्वी ही गुन्हे दाखल असल्याचे समजते.सध्या रेल्वे पोलिस दल (जीआरपी) कडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मोबाइल चोरटे हातावर फटका मारून रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या फटका गँगचा फटका हा अनेक प्रवाशांना बसून त्याचा नाहक बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रेल्वे पोलिसांना यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.