महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

मोहम्मद पैगंबर बिल या सारखे भविष्यात येणारे कायदे धार्मिक राजकारण खोदून काढतील – प्रकाश आंबेडकर 

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – मोहम्मद पैगंबर बिल संसदेत सादर झाले असून ती आता हाऊसची प्रॉपर्टी झाली आहे. तसेच संसदेने अशा प्रकारच्या कायद्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. अशी हि प्रॉपर्टी कायद्याच्या स्वरूपात नक्की भविष्यातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी अस्तित्वात येईल आणि अशा प्रकारचे कायदे धार्मिक राजकारण आणि जातीय तेढ निर्माण करून केल्या जाणाऱ्या राजकारणाला आळा घालेल. मुस्लिम समाजाने सक्रिय राजकारणात येऊन स्वतःचा आवाज भारतीय राजकारणात बुलंद केला पाहिजे. निव्वळ पाठिंबा देणारा मतदाता न होता भविष्यातील पिढीसाठी सक्षम उमेदवार देखील निर्माण केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडी संचालित https://paigambarmohammadbill.org/ या वेबसाईट चे उदघाटन देखील याप्रसंगी करण्यात आले.

पैगंबर बिल मधील मसुदा आणि तरतुदी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेत उपलब्ध आहेत. हा सोहळा साकीनाका येथील दारुल उलूम अली हसन अहले सुन्नत शाळेच्या सभागृहात झाला. तसेच वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सहारा हॉटेल (कुर्ला) ते अनिस कंपाउंड साकीनाका पर्यंत भव्य रॅली आयोजित केली होती. या रॅलीत जवळपास दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लक्षवेधी मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, आपण फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे आणि भारतीय संविधानाचे पाईक आहोत. हा कायदा जातीय तंटे किंवा सामाजिक अराजकता माजविणाऱ्या समाज कंटकांची किंवा त्या प्रकारच्या मानसिकतेची पायमल्ली करणारा आहे. या बिल मध्ये तशा प्रकारचे कठोर प्रविधान करून ठेवले आहे. कर्नाटकात चाललेले हिजाब प्रकरण असो किंवा दलित मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न समाजातील कमकुवत घटकांना यामुळे बळकटी येईल.

या प्रसंगी मुस्लिम संघटनांचे मान्यवर मौलाना मोहम्मद अशरफ साहब, मौ. सय्यद मो. राशीद अशरफ साहब, मौ. मो. हाशिम अशरफी साहब, मौ. मो. कमर रजा अशरफी साहब, मौ. मो. सय्यद मंजूर अशरफी साहब, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, शिस्त पालन समिती आणि राज्य प्रशिक्षण समिती सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अबुल हसन खान, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »