महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट

नेशन न्यूज मराठी टीम.

जालना / प्रतिनिधी – मराठा क्रांती मोर्चा लाठीचार्ज प्रकरणी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तेव्हा त्यांनी या घटनेचा निषेध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

राज ठाकरे म्हणाले कि, हे सगळे राजकारणी लोक तुमचा फायदा करुन घेत आहेत. चांगली मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. काही गोष्टी कायद्याने देखील समजून घ्या. परंतु हे सतत तुम्हाला जातीचं आणि आरक्षणाचं आमीष दाखवून कधी हे सत्तेत तर कधी विरोधात येतात. विरोधीपक्ष मोर्चे काढणार आणि मग ते सत्तेत आले की गोळ्या झाडणार.

जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा तुमच्यावर प्रेम असतं आणि सत्तेत गेल्यावर मारायला उठतात. पोलिसांना आदेश कोण देत आहे त्यांना दोष द्या. जे वरुन आदेश आले की पोलिसांना ते करावंच लागणार. जे वरुन आदेश आले की पोलिसांना ते करावंच लागणार. येणाऱ्या पिढ्यांना दाखवलं पाहिजे की आमचा राजा कोण होऊन गेला. ज्या लोकांनी तुमच्यावर गोळ्या घालायला लावल्या त्या सर्व लोकांना मराठवाडा बंदी करुन टाका. देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही. विषय सुटण्यासारखा असेल तर निश्चित सोडवू. गेंढ्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमवू नका. असा सल्ला देखील या वेळी त्यांनी नागरिकांना दिला.


    Related Posts

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Translate »