महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

रुक्मिणीबाई रूग्णालयाला सिव्हील रुग्णालयाचा दर्जा देण्याची मनसेची मागणी

कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला सिव्हिल रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी मनसेने केली असून याबाबत मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे संचालित बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दरवर्षी हजारों रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घ्यायला येतात. पण योग्य वेळी योग्य आरोग्य सेवा उपलब्ध नसल्या कारणाने रुग्णाला मुंबईच्या रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात भटकंती करायला लागते. औषधांचा तुटवडा, आरोग्य अधिकाऱ्याची कमतरता आणि रुग्णाकडे दुर्लक्ष हि नेहमीची बाब आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची लोकसंख्या आणि नजीकच्या दुसऱ्या उपनगरांची लोकसंख्या आणि येणाऱ्या रुग्णाची संख्या लक्षात घेता, कल्याण शहरात एक सिव्हिल रुग्णालयाची गरज भासत आहे.

राज्य सरकारला याबाबत पाठपुरावा करून देखील राज्य सरकार याकडे लक्ष देत नसल्याने केंद्र सरकारने या बाबतीत लक्ष देउन बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला सिव्हिल रुग्णालयाचा दर्जा दिला तर नागरिकांना सोयीस्कर होईल. या रुग्णालयाची इमारत दर्जेदार असून येथे सर्व सुविधा संपन्न सिव्हिल रुग्णालय होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत योग्य लक्ष देऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी मनसेच्या रुपेश भोईर यांनी केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »