महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा

नेशन न्यूज मराठी टिम.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित  पवार यांनी आज अमळनेर येथे राष्ट्रवादी महिला, पुरुष, युवक अशा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा घेतला.या मेळाव्याला जिल्हाभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार यांचा मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सत्कार केला. 

शेतकऱ्यांचा आसूड हा सरकारवर उगववा, हे डोळ्यासमोर ठेवून आमदार रोहित पवार यांना आसूड देण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बैलगाडी देवून यावेळी आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.

आता तर टिव्हीवर भाजप नेत्याच भाषण सुरू असेल तर कुणी पाहत नाही, त्यापेक्षा साऊथ इंडियन पिक्चर सर्व जण पाहतात, लोक भाजप नेत्याच्या भाषाणापेक्षा मनोरंजनासाठी साऊथ इंडियन पिक्चर पाहणं पसंत करतात अशी सडकून टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावातील अमळनेर येथील मेळाव्यात केली आहे.

जळगाव जिल्ह्यात जसं बोगस खते आणि बोगस बियाणे निघाले त्याच पद्धतीने आपले सरकार सुद्धा बोगस आहे.या सरकारला शेतकरी, युवा महिला , रोजगार यांच्याबद्दल काहीही घेणे देणे नाही

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर टीव्ही वर बातमी यावी म्हणून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गोष्टीमध्ये टिव्ही वर येण्यासाठी आमदार अनिल पाटील यांची मोठी धडपड  असते.

विरोधात असताना मंत्री अनिल पाटील यांनी विधानभवनात कापासासाठी आंदोलन केलं. आता सत्तेसाठी सर्व सामान्य लोकांचे प्रश्न हे विसरले अशा या नेत्याने मंत्री झाल्यावर ज्या भूमीचे दर्शन घेतले, त्याच भूमीतील नागरिक, लोक, मतदार हे मंत्री अनिल पाटील यांना 2024 मध्ये त्यांची जागा दाखवेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »