महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

सेंच्युरी रेयॉन कंपनीद्वारा किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबिर

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – शहाड येथील सेंच्युरी रेयॉन व्यावसायिक,सामाजिक जबाबदारी अंतर्गत रायते विभाग हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींसाठी भव्य आरोग्य मार्गदर्शन शिबिर पार पडले. इयत्ता ८वी ते १०वी च्या सुमारे २५० मुलींना किशोर वयात शरिरात व स्वभावात होणारे अंतर्गत बदल, मासिक पाळी वरील समस्या व गैरसमज, मनाची अस्थिरता व त्याची कारणे, समतोल आहार, निद्रा व पुरेसा व्यायाम इत्यादी विषयावर मौखिक व चलचित्र द्वारा तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामिण व दुर्गम भागात आजही किशोरवयीन मुलींच्या मनात आरोग्य विषयी खूप समस्या असतात. या समस्या घरात निर्भिडपणे सांगत सुद्धा नाहीत शिवाय या समस्यांवर वेळीच मार्गदर्शन सुद्धा मिळत नाही. त्यामुळे अनेक गैरसमज आणि आजारांना या मुलींना सामोरे जावे लागते. म्हणून हे शिबिर घेण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ महिला आधिकारी शिल्पा शहा यांनी शिबिर उद्घाटनप्रसंगी सांगितले. सर्व उपस्थित मुलींना भेट स्वरूप सॅनेटरी नॅपकिन संच, मारक, सेनिटायजर व शेंगदाणा चिक्की पाकिटे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी रायते  जिल्हापरिषद सदस्य महेंद्र जाधव, मुख्याध्यापक सी.एस.पाटील व इतर शिक्षक वर्ग व कर्मचारी इत्यादी उपस्थित असल्याचे कंपनीचे जनसंपर्क आधिकारी मेहूल लालका यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »