DESK MARATHI NEWS ONLINE.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत एका 31 वर्षीय मतीमंद तरुणीवर लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक करून गजाजाड केले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फैजल खान असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.7 तारखेला पीडित गतिमंद तरुणीला कल्याण ग्रामीण परिसरातील सोनारपाडा परिसरात एका नातेवाईकच्या घरी जायचे होते. तिथे जाण्याकरिता पीडित तरुणीने रिक्षा पकडली.रिक्षाचालक फैजल याने याचा फायदा घेत तिला सोनारपाडा येथे न सोडता मुंब्रा येथील निर्जन स्थळी नेले. त्याठिकाणी पीडित तरुणीवर लैगिक अत्याचार केला.
काही तासानंतर त्या तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या नातेवाईकांना सांगितले. रिक्षा चालकाने तिला सोनारपाडा येथे न सोडता मुब्रा येथील एका निर्जन स्थळी नेले. त्याठिकाणी फैजलने तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीच्या आईने ९ एप्रिल रोजी टिळकनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. सोनारपाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासा दरम्यान पोलीसांच्या हाती फैजल याच्या रिक्षाचा नंबर हाती लागला.त्या नंबरच्या सहायाने त्याचा पत्ता देखील पोलिसांच्या हाती लागला. ९ एप्रिल रोजीच्या रात्री पाेलिसांनी आरोपी फैजल खान याला दिवा येथून अटक केली आहे.गुरुवारी दुपारच्या सुमारास फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने फैजलला १४ एप्रिल रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याण परिमंडळ -3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुभाष हेमाडे आणि टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या नराधमाला अटक करण्यात यश आले.