नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – लोकसभा निवडुकीची महाराष्ट्रात रणधुमाळी सुरू आहे. नेतेमंडळींचा जनतेसमोर स्वतःला चांगले आणि विरोधकाला वाईट ठरवण्यासाठी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दुष्काळ, रस्ते तसेच रोजगारसारख्या अनेक प्रश्नांनी दक्षिण अहमदनगर मंतदारसंघ ग्रासलेला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजप कडून डॉ.सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके लोकसभा निवडणूक लढत आहे.
आज चौथ्या टप्प्यातील मतदान अहमदनगर मतदारसंघात सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पारनेर तालुक्यातील हंगा या गावी मतदान केले आहे. “जेव्हा जनतेने निवडणूक हाती घेतलेली असते तेव्हा परिवर्तन अटळ असते. जनतेच्या आशिर्वादाने मी निश्चित निवडून येईल” अशी प्रतिक्रिया मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी मिडियाशी बातचीत करताना दिली.



