नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी -आज ७४ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने तसेच 26/11 च्या मुंबई येथील बॉम्बच्या प्राणघातक हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कल्याणच्या शिवाजी चौकापासून ते प्रेम ऑटो जवळील साई निर्वाण दरम्यान ‘लोकशाहीसोबत चाला’ या उद्देशाने मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शेठ हिराचंद मुथा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, मुथा फाउंडेशन, शेठ हिराचंद मुथा स्कूल, कमलादेवी कॉलेज, कल्याण डिस्ट्रिक बार असोसीएशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याणच्या शिवाजी चौक येथून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून, संविधानास अभिवादन करून रॅली सुरू करण्यात आली.