पुण्यात/प्रतिनिधी – पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात शनिवारी १९ मे रोजी रात्री एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याला पुण्यातील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. वेदांत अग्रवाल हा दारूच्या नशेत चारचाकी चालवत होता. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, बार अवैधरित्या चालवणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यात सुरू असलेल्या अवैध प्रकारांवर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या “पुणे शहरात अनेक अवैध व नियमबाह्य गोष्टींना उधाण आले आहे. ज्यात प्रामुख्याने पुणे शहरातील अनधिकृत पथ, बर, रुफ टॉफ हॉटेल्स त्यांची अवैध बांधकामे रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत चालणारी हॉटेल्स, स्नॅक्स सेंटर्स व रस्त्यावरील रात्रीचे खाद्यपदार्थाचे अनधिकृत स्टॉल यांचा समावेश आहे. यामुळे पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलेले आहे. वेदांत अग्रवाल संबंधित घटना हे त्यांचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे व अशा घटना पुण्यात वारंवार सातत्याने घडत आहेत