DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील नावाजलेली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या १८ संचालक पदा करिता रविवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणी अंती भाजपा,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती पक्षाने १६ जागांवर दणदणीत विजय मिळवित निर्विवाद यश मिळवित ढोल ताश्याच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोषात महायुतीचा झेंडा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर फडकविला. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेस चे प्रमोद हिंदुराव जल्लोषात सहभागी होते
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल गत वर्षी संपल्याने दोन वेळा सहा सहा महिन्याची मुदत संपल्याने अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे मान्यतेने निवडणूक निर्णायक अधिकारी तथा उप निबंधक सहकारी संस्था कल्याण चे निवडणूक अधिकारी यांच्या मान्यतेने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागा साठी निवडणूक घेण्यात आल्या होत्या.निवडणूक प्रक्रियेतील हमाल व मापाडी (तोलाई) या एक जागे साठी शंकरराव आव्हाड हे बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १७ जागा साठी ५१ उमेदवार रिंगणात होते.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी २९ जून रोजी निवडणूक घेण्यात आली .रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्ड मधील कल्याण बेंकवेट हॉल येथे सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.सकाळ पासूनच बाजार समितीच्या आवारात निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदार जल्लोषात मतदान प्रक्रियेत भाग घेत होते.मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी निवडणुकीत उभे असलेल्या विविध पॅनल व बाजार समितीतील विविध संघटना मतदारांना मतदानासाठी ने आण करण्यासाठी धावपळ करत होते. गेल्या पंधरा एक महिन्या भरा पासून बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला असून प्रचाराच्या बँनरची बाजार समितीच्या आवारात चांगलीच धुळवड उडाली होती.
या निवडणुकीत निवडणुकीत ,महायुती,शेतकरी सहकारी विकास पॅनल ,फुल मार्केट व्यापारी संघटना, व्यापारी एकता परिवर्तन पॅनल, व्यापारी विकास पॅनल आणि महाविकास आघाडी गट रिंगणात उतरले होते.महायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनल धुरा आमदार किसन कथोरे यांनी खांद्यावर घेतली होती त्यांना शिवसेना शिंदे गटाचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली खाली निवडणुकीला सामोरे गेलेल्यामहायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलचे पहिल्या पासून पारडे जड होते.आमदार किसन कथोरे यांचा कल्याण तालुक्यातील गावा मध्ये दांडगा संपर्क व दबदबा असल्यामुळे कृषी पत व बहुद्देशीय सहकारी संस्थासाठी असलेल्या ११ जागा व ग्रामपंचायत ४ जागा अश्या १५ जागावर एक हाथी वर्चस्व असल्याने या पंधरा जागा सहा व्यापारी आडते २ जागावर लक्ष केंद्रित केले होते. सकाळी आठ वाजल्या पासून दुपारी चार वाजे पर्यंत पार पडलेल्या मतदान झाल्या नंतर लगेचच सायंकाळी पाच सहा च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली.मतमोजणी कडे निवडणुकीत उभे राहिलेल्या सात इच्युक उमेदवारासह राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले होते.मतमोजणी अंती १८ जागा पैकी १६ जागांवर महायुतीचा शेतकरी सहकारी विकास पॅनलचे उमेवार निवडून आले या मध्ये कृषी पत व बहुद्देशीय सह संस्था मतदार संघा साठी असलेल्या ११ जागा वर निर्विवाद विजय मिळवित सर्वांच्या सर्व जागांवर विजय मिळविला, ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४जागा पैकी ३ जागा वर विजय मिळविला ,व्यापारी मतदार संघाच्या २ जागा पैकी १ जागा तर हमाल माथाडी मतदार संघा साठी असलेली १ जागा अश्या अठरा पैकी सोळा जागा वर दणदणीत विजय महायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलने मिळविला.तर उर्वरित दोन जागा पैकी एका जागेवर ठाकरे गटाने तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत
या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांनी दिली