DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -महापारेषणच्या पडघा- मोहने १०० के.व्ही. या वीज वाहिनीत सोमवार दिनांक ११.०० रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान बिघाड झाल्याने महावितरणच्या सुमारे एक लाख वीज ग्राहकांना आठ तास भार व्यवस्थापन सहन करावे लागले. महापारेषणच्या पडघा- मोहने वीज वाहिनीच्या मनोर्यातील तार गाळेगाव परिसरात अचानक तुटून पडली. परिणामी महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथील एक लाख वीज ग्राहकांना याचा फटका बसला.
अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या यंत्रणेवर ताण आला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. परिणामी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरात महावितरणला सकाळी ११.०० पासून भार व्यवस्थापन करावे लागले.अखेर संध्याकाळी ६.१५ च्या दरम्यान महापारेषणचा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर महावितरणकडून अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील वीज ग्राहकांना टप्याटप्याने वीजपुरवठा करण्यात आला.