महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image यशोगाथा लोकप्रिय बातम्या

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी नवे वायुदल प्रमुख

नवी दिल्ली/प्रतिनिधी – नांदेड जिल्हयाचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने देशाचे नवे वायुदल प्रमुख म्हणून विद्यमान उपप्रमुख एअर मार्शल विवेक चौधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत असून एअर मार्शल चौधरी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारतील.

एअर मार्शल विवेक चौधरी हे मुळचे नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतून शिक्षण पूर्ण करून २९ डिसेंबर १९८२ रोजी वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले. वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी एअर मार्शल विवेक चौधरी यांनी लडाखसह उत्तर भारतातील हवाई हद्दीची जबाबदारी असलेल्या वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. वायुदलात त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »