महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा चर्चेची बातमी

प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; ४५ पदकांची कमाई करुन पटकावले अग्रस्थान

मुंबई/प्रतिनिधी – केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी २२ सुवर्ण आणि २३ रजत पदके, अशा एकूण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातून आता एकूण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकूण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे.  स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकूण ४५), राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६), गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकूण १२), मध्य प्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकूण ४) गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकूण ३) तर ओडीशाने २ रजत पदकांची कमाई केली आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी तरुणांनी जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आता जागतिक स्पर्धेतील विजयाचे ध्येय ठेवावे – प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. गांधीनगर येथील प्रादेशिक स्पर्धेत महाराष्ट्रातील युवक-युवतींनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या स्पर्धकांनी आता राष्ट्रीय स्पर्धेची आणि त्यानंतर होणाऱ्या जागतिक स्पर्धेची जय्यत तयारी करावी. स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कौशल्याला चालना देण्याच्या अनुषंगाने विभाग संपूर्ण मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील तरुणांचे यश अद्भूत – दीपेन्द्र सिंह कुशवाह

कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह म्हणाले की, गांधीनगर येथील स्पर्धेत महाराष्ट्रातील तरुणांनी मिळविलेले यश अद्भूत असेच आहे. यासाठी या तरुणांनी फार मेहनत घेतली आहे. आता राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठीही त्यांनी अशीच तयारी करावी. या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सुवर्ण पदक विजेते

राज्यातील मोहम्मद सलमान अन्सारी, रिंकल करोत्रा, दिशा सोनवणे, कोमल शिवाजीराव कोडलीकर, अंकीता अंबाजी गांगुर्डे, ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ, स्टॅनली सोलोमन, योगेश दत्तात्रय राजदेव, देवेज्या, श्रीराम कुलकर्णी, लावण्या पुंड,  विश्वजित रेवनाथ भुर्के, आयुषी अरोरा, पुर्वी सिधपुरा, गणेश भावे दगडोबा, मित्रा राव, अर्जुन मोगरे,  ओंकार गौतम कोकाटे, जीवन संपत चौधरी, तोजांगण रवींद्र ढाणू, विकास चौधरी, सजिव कुमार सबवथ यांनी सुवर्ण पदक पटकावले.

रजत पदक विजेते

मिलींद निकम, योगेश अनिल खंडागळे, सलमान रफीक शेख, वेद इंगळे, हर्षल गजानन शिरभाते, सचिन भारत जाधव, वृंदा पाटील, सृष्टी मित्रा, यश दिनेश चव्हाण, आकांक्षा कैलास पवार, मिर्झा कबिरुल्लाह बेग मिर्झा असदुल्लाह बेग, प्रियांका सिद्धार्थ टिळक, योगेश दत्तू गनगोडे, प्रतिक राजेंद्र हिनघेद, आनंद फकिरा घोडके, ध्रुव पाटील, ओम विनायक गायकवाड, अश्लेषा भरत इंगवले, अभिषेक भाई पाटील, मोहम्मद हानिफ मोहम्मद यासीन बेलीम, आदित्य दीपक हुगे, भार्गव कुलकर्णी, जुनेद अडेनवाला यांनी रजत पदक पटकावले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »